नागपूर,
Jyotiba Secondary School ज्योतिबा माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या तथा ‘माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान’च्या संघटक अरुणा कडू यांना शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘ज्ञानदीप पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
नागपूर ग्लोबल फाउंडेशन ऑफ इंडिया, पुणे यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ६ सप्टेंबर रोजी वाई (जि. सातारा) येथील रमेश गरवारे सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. देऊळबंद चित्रपटाचे निर्माते तेजपाल वाघ व सिनेअभिनेते अतुल कुदळे यांच्या हस्ते अरुणा कडू यांचा गौरव करण्यात आला.यावेळी ग्लोबल फाउंडेशनच्या अध्यक्षा वर्षा जाधव, वाई भूषण मिलिंद माने, श्री. पठाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन विद्यानिकेतन संस्थेचे संचालक शशिकांत कोचळे यांनी केले.
सौजन्य :जामूवंत वांदे,संपर्क मित्र