घातक हत्यारे व साहित्य जप्त
वाशीम,
local crime branchs swift crackdown शहरातील रेल्वे स्टेशन परीसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफिने ताब्यात घेतले व त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडुन दरोडयच्या तयारीसाठी वापरण्यात येणारे घातक हत्यारे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. वाशीम शहर पोलिस ठाणे हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरातील पडीत जागेत काही इसम अंधाराचा फायदा घेवुन दरोडा घालण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसले असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांना प्राप्त झाली होती.

सदर माहितीच्या आधारे स्थागुशाच्या पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी केली असता संशयित इसम आढळून आले, पोलिसांनी शिताफीने कारवाई करुन त्यांना ताब्यात घेतले. सदर कारवाईमध्ये विशाल कालबाल्या चव्हाण (वय ३५) रा.लहुजी नगर वाशीम, यशवंत गंगाराम चव्हाण (वय ३४) रा. चांडस ता. मालेगाव जि. वाशीम व शंकेश मनोहर भोसले (वय २०) रा. चांडस ता. मालेगाव जि. वाशीम सदर आरोपींकडुन दोन चाकु, मिरची पुड, एक लांब खिळा, दोन हैडग्लोज तसेच एक जुना वापरता मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे संभाव्य दरोडयाचा प्रकार घडण्यापुर्वीच उथळुन लावण्यात आला असून, पुढील तपास वाशीम शहर पोलिस करीत आहे. सदर कारवाई जिपोअ निकेश खाटमोडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि सुधाकर आडे, पोउपनि निलेश जाधव, हवालदार गजानन झगरे, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, दिलीप देवकते, राजकुमार यादव, भुषन ठाकरे, अमाले ईरतकर, संतोष वाघ, तुषार ठाकरे, संदीप दुतोंडे, गोपाल चौधरी, तसेच चालक सुनिल तायडे यांनी केली.