नागपूर,
Marbat celebrations are start नागपूर शहराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या मारबत उत्सवाला सुरुवात झाली असून नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मारबतच्या दर्शनासाठी शहरातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने मारबत मार्गावर दाखल होत आहेत.मारबतचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांमध्ये मोठी आतुरता असून सकाळपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पारंपरिक वेशभूषा, विविध सामाजिक संदेश देणारे फलक आणि उत्सवी वातावरणामुळे मारबत मार्गावर नागरिकांची गर्दी वाढत आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मारबत उत्सव २०२६ साठी विशेष तयारी करण्यात आली आहे. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि आवश्यक मूलभूत सुविधा याकडे प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात आले आहे. नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या या ऐतिहासिक उत्सवासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह असून, मारबत उत्सवाच्या निमित्ताने शहरातील पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडत आहे.