जयपूर,
Murder of wife and three daughters राजधानी जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने पत्नी आणि तीन मुलींच्या डोक्यात दगडाने प्रहार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. चौघांचेही मृतदेह एकाच ठिकाणी सापडले. आरोपी पती राहुल झा घटनास्थळावरून फरार असल्याचे वृत्त आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला.
पाेलिसांनी आरोपीच्या शोधात त्याच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले. एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस सध्या हत्येमागील हेतू आणि घटनाक्रमाची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलींच्या आजोबांनी सांगितले की, मुलींचे वडील सकाळपासून फरार होते. प्राथमिक दृष्ट्या, संशय त्याच्यावरच जातो. घटनास्थळी रक्ताने माखलेले कपडे आढळले आहेत. सीसीटीव्ही आणि इतर पुरावे गोळा केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.