वर्धा,
dr bhoyar महात्मा गांधी इ्स्टिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सेवाग्राम ही संस्था केवळ वर्धा जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे काम करीत आहे. २०२० एमबीबीएस बॅचच्या नवोदित डॉक्टरांनी समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
सेवाग्राम येथील महात्मा गांधी इ्स्टिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये आयोजित स्थापना दिन तसेच बॅच २०२० च्या नवोदित डॉक्टरांच्या पदविदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव डॉ. बी. एस. गर्ग, अधिष्ठाता डॉ. ए. के. शुक्ला, डॉ. पुनम शिवकुमार, डॉ. सतीश कुमार यांची उपस्थिती होती.
कोरोना महामारीच्या अत्यंत आव्हानात्मक काळात वैद्यकीय शिक्षणास सुरुवात केलेल्या २०२० च्या एमबीबीएस बॅचने प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, आत्मविश्वास आणि सेवाभाव जपला. त्यामुळे या बॅचला केवळ कोरोनाची बॅच न म्हणता कोरोना योद्ध्यांची बॅच म्हणून ओळखले पाहिजे, असे पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले. या संस्थेतून मिळालेले संस्कार समाजातील गरजू आणि वंचित घटकांच्या सेवेसाठी वापरावेत, असे ते म्हणाले. डॉ. बी. एस. गर्ग यांनी विद्यार्थी आता संवेदनशील डॉक्टर म्हणून समाजात प्रवेश करीत असून, रुग्णांशी सहानुभूतीने वागावे असे सांगितले. अधिष्ठाता डॉ. ए. के. शुक्ला यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते विद्याथ्र्यांना एमबीबीएस पदवीचे वितरण करण्यात आले. तसेच नवोदित डॉक्टरांना डॉक्टर प्रतिज्ञा देण्यात आली.