ढाका,
Rahman will not attend the BRICS summit भारताच्या यजमानपदाखाली १२ आणि १३ सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केल्या जाणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान उपस्थित राहणार नाहीत.बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हुमायूं कबीर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, बांगलादेशच्या पंतप्रधानांना या परिषदेसाठी थेट किंवा वैयक्तिक निमंत्रण मिळालेले नाही. त्यामुळे ते या बैठकीला हजेरी लावणार नसून बांगलादेशचे केवळ एक प्रतिनिधीमंडळ या परिषदेला पाठवले जाईल.परिषदेसाठी भारताने बांगलादेश सरकारमधील कोणाला निमंत्रित केले नाही. आमच्या पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. भारताकडून हे निमंत्रण बांगलादेशच्या पंतप्रधानांना वैयक्तिक स्वरूपात नसून ‘बिम्सटेक’च्या अध्यक्षांना पाठवण्यात आले. त्यामुळे पंतप्रधानांच्या सहभागाचा प्रश्नच उद्भवत नाही.