वर्धा,
Son murders father पुलगाव नजित असलेल्या विरुळ (आकाजी) येथे कौटुंबिक वादातून झालेल्या खुनाने गालबोट लागले. मुलगा प्रणय चौधरी (३०) याने वडील परमेश्वर, वय ५५ वर्षे, याच्यावर वीट मारून त्यांचा खून केल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर यांचे पत्नीसोबत पटत नसल्यामुळे ती मुलगा प्रणय व मुलगी यांना घेऊन रसुलाबाद येथे वेगळी राहत होती. प्रणय विरुळ येथे आला असता त्याची वडिलांशी भेट झाली. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर प्रणयने वडील परमेश्वरवर हात उगारला. त्यानंतर बाजूला पडलेली वीट उचलून मारहाण केली. यात गंभीर दुखापत झाल्याने परमेश्वरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने तान्हा पोळ्याच्या उत्साहावर विरजण पडले. घटनेची माहिती मिळताच पुलगाव उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखैळे, ठाणेदार ढाकणे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनीही घटनास्थळाची पाहणी केली. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी प्रणयला अटक केली.