लाडक्या गणाधीशाच्या आगमनाचे वेध

ग्रामीण भागात उत्साह शिगेला

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
मानोरा,
lord ganeshas arrival ग्रामीण भागामध्ये लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. मूर्तिकारांच्या कार्यशाळेत श्री गणेश मूर्तींची शेवटच्या टप्प्यातील सजावट व रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आल्याने गावागावात गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाऊस रुसल्याने वातावरण काळजी मय बनलेले असून, सुद्धा मूर्तिकार रात्रंदिवस जागून मूर्तींना आकर्षक रूप देत आहेत. डोळ्यांची नक्षी, मुकुट, हार, धोतर आणि मोदकाचा साज शृंगारताना मूर्तिकारांची कसब पणाला लागत आहे.
 
 
lord ganeshas arrival
 
मानोरा तालुयातील भिलडोंगर, खांबाळा, गिराटा, पोहरादेवी, उमरीसह प्रत्येक गावातील सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेश भक्तांनी आपापल्या बाप्पाची बुकिंग महिनाभर आधीच केली आहे. आता फक्त मुहूर्ताची वाट पाहिली जात आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात गणेशोत्सवाचा उत्साह काही औरच असतो. शेतातील कामे आटोपून शेतकरी, तरुण मंडळी मंडप सजावट, विद्युत रोषणाई, ढोल-ताशा पथकाची तयारी करत आहेत. लहान मुलांमध्ये तर नवीन कपडे आणि बाप्पाच्या आगमनाची प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.एक-दोन दिवसातच ’गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात या मूर्ती बैलगाडी, ट्रॅटर-ट्रॉलीतून वाजत-गाजत आपापल्या गावात, मंडपात विराजमान होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुयात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.