मुंबई,
bigg boss 20 ‘बिग बॉस २०’च्या घरात स्पर्धकांमधील वाद पुन्हा एकदा चांगलाच रंगला. कॅप्टनसी आणि घरातील कामांच्या मुद्द्यावरून कनिका मान आणि यंग डीएसए यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. कनिकाने तिची लाईफलाईन गमावल्यानंतर दोघांमधील संबंध ताणले गेले असून, यावेळी महिलांनी पुरुषांचे वॉशरूम वापरण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा वैयक्तिक टोमण्यांपर्यंत पोहोचली. यंग डीएसएने गुल्लू आणि कनिका यांच्या जवळिकीवर केलेल्या टिप्पणीवर कनिकाने ती अयोग्य असल्याचे सांगत आक्षेप घेतला.
यानंतर घरातील कामावरूनही दोघांमध्ये वाद झाला. कनिकाने यंगच्या कॅप्टनसीवर प्रश्न उपस्थित करत कॅप्टनने काम करायचे की नाही, यावर त्याला सुनावले. यंगनेही प्रत्युत्तर दिल्याने वातावरण तापले. चर्चेदरम्यान गेमर स्काउट ओपीने कनिकाला टीव्ही कलाकारासारखे वागणे थांबवण्याचा सल्ला दिला. त्यावर कनिकाने स्पष्ट शब्दांत, ‘मला टीव्ही अभिनेत्री असल्याचा अभिमान आहे,’ असे उत्तर दिले. यावेळी घरातील काही स्पर्धकांनी कनिकाची बाजू घेत यंगच्या कॅप्टनसीवरही प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, अमन गांधी आणि आसिफ खान यांच्यातही वेगळ्या मुद्द्यावरून वाद झाला. यंगला त्याच्या पडद्यावरील प्रतिमेला धक्का पोहोचेल अशा वादांपासून दूर राहण्याचा सल्ला अमनने दिला. त्यावर आसिफने विरोध करत वर्ग आणि लोकल ट्रेनमधील प्रवासाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू केली. दुसरीकडे, माही विज आणि आम्रपाली दुबे यांच्यातही वाद झाला. आम्रपालीने उदिती सिंगच्या जेवणाबाबत केलेल्या टिप्पणीवर माही नाराज झाली. चूक लक्षात आल्यानंतर आम्रपालीने उदितीची माफी मागितली. या सर्व घडामोडींमध्ये यंग डीएसए दिवसा झोपताना आढळल्याने बिग बॉसने घरातील सदस्यांना शिक्षा केली. घरातील नियम मोडल्याबद्दल संपूर्ण घराचे रेशन ३० टक्क्यांनी कमी करण्यात आले.