हरीश रावतांचा काँग्रेस पदांवरून राजीनामा

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
डेहराडून,
Harish Rawat resigns उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी काँग्रेसच्या दोन संघटनात्मक पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या माजी ओएसडी चंदन सिंह जीना यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर रावत यांनी हा निर्णय जाहीर केला. ते उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीचे सदस्य तसेच काँग्रेस कार्यसमितीचे स्थायी निमंत्रित सदस्य होते.
 
 
 
24345
 
भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांच्या आरोपांवर रावत यांनी भूमिका स्पष्ट करत, आपल्या कार्यकाळात ४२ हजारांहून अधिक सरकारी पदांवर भरती झाल्याचा दावा केला. आपल्या कोणत्याही कृतीमुळे काँग्रेसच्या भ्रष्टाचारविरोधी संघर्षाला धक्का लागू नये, यासाठी पदांवरून बाजूला होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्याविरोधात किंवा भरती प्रक्रियेत हस्तक्षेपाचे पुरावे असल्यास ते सीबीआय, ईडी किंवा राज्य पोलिसांकडे सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले.