नागपूर,
Hartalika Vrat हरितालिका व्रत भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेला केले जाते. या व्रताची प्रधान देवता माता पार्वतीआहे. या दिवशी उमा-महेश्वराची मूर्ती स्थापन करून विधीपूर्वक पूजा केली जाते. काही ठिकाणी तिळ व तुपाची आहुती देऊन हवनही केले जाते. हरिकाली, हस्तगौरी आणि कोटेश्वरी या पार्वतीच्या रूपांचेही व्रत केले जाते.
विशेषतः स्त्रिया हे व्रत श्रद्धेने करतात. माता पार्वतीने भगवान शिवांना पतीरूपाने प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते, अशी मान्यता आहे. योग्य वर मिळावा यासाठी विवाहयोग्य कन्या हे व्रत करतात. सौभाग्य अखंड राहावे आणि आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी विवाहित स्त्रियाही हे व्रत करतात. श्रद्धेने व्रतपालन केल्याने सांसारिक अडचणी दूर होऊन आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो, अशी धार्मिक मान्यता आहे.
सौ. आदिती अमित देखणे,
नवीन पनवेल.