जरांगेनी इराक, कुवैत किंवा बलुचिस्तानमध्ये जावे!

लक्ष्मण हाकेंची टीका

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
सोलापूर,
Laxman Hake takes a dig at Jarange हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना हाके यांनी हा प्रकार ओबीसींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर टीका करताना आता मुंबईत जाऊ नये, तसेच दिल्लीलाही जाऊ नये, असे आवाहन करत लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. मुंबईत आता त्यांचे म्हणणे कोणीही ऐकणार नाही, असा दावा त्यांनी केला. यापुढे हैदराबाद गॅझेटचा पुरावा मिळवण्यासाठी इराण, इराक, कुवैत किंवा बलुचिस्तानमध्ये जावे, असा टोला हाके यांनी लगावला. निजामाच्या औलादी तिकडे असल्याचा उल्लेख करत त्यांनी हैदराबाद गॅझेटचा पुरावा इराणमध्ये मिळेल, अशी उपरोधिक टिप्पणी केली. त्यामुळे मनोज जरांगे यांचे मुंबईतील आंदोलन आता चालणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
 
Laxman Hake takes a dig at Jarange
केवळ आक्रमक भूमिका किंवा संताप व्यक्त करून आरक्षण मिळत नसते, तर त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करावे लागते, असे त्यांनी सांगितले. लोकशाही व्यवस्थेत संविधान आणि कायदा महत्त्वाचा असून कोणावर हल्ला करून किंवा कोणाचा जीव घेऊन आरक्षण मिळवता अथवा देता येत नाही, असे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले. 96 कुळी, 92 कुळी किंवा क्षत्रिय असल्याच्या दाव्यांवरून दादागिरीचे राजकारण करून महाराष्ट्राला वेठीस धरू नये, अशी टीकाही त्यांनी केली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्र हे सर्व सहन करत असल्याचा दावा करत त्यांनी मनोज जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या राजकीय नेत्यांवरही निशाणा साधला. सोलापूर जिल्ह्यातील अभिजीत पाटील, शहाजी पाटील, पुण्यापासून जालना आणि बीडपर्यंत रोहित पवार, शरद पवार, भाजपचे सुरेश धस आणि नारायण कुचे यांसारख्या नेत्यांनी जरांगेंना पाठिंबा दिल्याचे सांगत, या नेत्यांनी ओबीसींच्या आरक्षणाच्या हक्कावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप हाके यांनी केला. भविष्यात हे नेते मत मागण्यासाठी आल्यास ओबीसी समाज त्यांना जाब विचारेल, असेही त्यांनी म्हटले.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करण्याची भूमिका मांडताना हाके यांनी मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण देण्यात आल्याचे तसेच नरेंद्र मोदी यांनी ईडब्ल्यूएस आरक्षण दिल्याचे नमूद केले. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणातील वाटा मागण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे यांनी आतापर्यंत ११ उपोषणे केली असून प्रत्येक वेळी सरकारकडून आश्वासने मिळाल्यानंतर त्यांनी किती वेळा अंगावर गुलाल घेतला, असा प्रश्नही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. सरकार त्यांना फसवत होते का, असा सवाल करत त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरही टीका केली.