मुंबई
pf money कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांसाठी पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. गरजेच्या वेळी पीएफमधून अंशतः रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि स्पष्ट करण्यात आली असून, आता आजारपणावरील उपचार, मुलांचे शिक्षण, लग्न, घर खरेदी किंवा घर बांधकाम यांसारख्या विविध कारणांसाठी सहजपणे पीएफमधून पैसे काढता येणार आहेत.
नव्या नियमांनुसार पीएफ अॅडव्हान्सचे तीन मुख्य गट करण्यात आले आहेत. यामध्ये आवश्यक गरजा, घराशी संबंधित गरजा आणि विशेष परिस्थितींचा समावेश आहे. त्यामुळे कोणत्या कारणासाठी किती वेळा पैसे काढता येतील, याबाबतचा संभ्रम कमी होणार आहे.
वैद्यकीय उपचार किंवा मेडिकल इमर्जन्सीची गरज असल्यास सदस्याला पीएफमधून अॅडव्हान्स घेता येईल. या कारणासाठी पैसे काढण्यावर ठराविक वेळेची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. म्हणजेच गरज पडल्यास पात्र सदस्य अनेक वेळा पीएफ अॅडव्हान्स घेऊ शकतो.
मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा अभ्यासाच्या खर्चासाठी पीएफमधून अॅडव्हान्स घेता येतो. मात्र, संपूर्ण नोकरीच्या काळात या कारणासाठी जास्तीत जास्त 10 वेळा पैसे काढण्याची सुविधा आहे.
स्वतःचं लग्न, मुलांचं लग्न किंवा भाऊ-बहिणीच्या लग्नासाठी पीएफमधून पैसे काढता येतील. या कारणासाठी संपूर्ण सेवाकाळात जास्तीत जास्त 5 वेळा पीएफ अॅडव्हान्स घेता येईल. घर किंवा प्लॉट खरेदी, घर बांधणं, होम लोनची परतफेड तसेच घराची दुरुस्ती किंवा रिनोव्हेशन यासाठी अॅडव्हान्स घेता येईल. या कारणांसाठी सेवाकाळात जास्तीत जास्त 5 वेळा पैसे काढता येतील. विशेष परिस्थिती किंवा इमर्जन्सीसाठी मात्र 2 वेळा पैसे काढण्याची मर्यादा आहे.
नव्या नियमांनुसार, पात्र सदस्य आवश्यक अटींची पूर्तता केल्यानंतर आपल्या एकूण ईपीएफ शिल्लक रकमेपैकी 75 टक्क्यांपर्यंत रक्कम अॅडव्हान्स स्वरूपात काढू शकतो. यासाठी सदस्याने ईपीएफ खात्यात किमान 12 महिन्यांचा कालावधी पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे. त्यामुळे अचानक आर्थिक अडचण किंवा गरज निर्माण झाल्यास कर्मचाèयांना त्यांच्या झऋ खात्यातील निधीचा अधिक सहजपणे वापर करता येणार आहे.