निजामुद्दीनला जाण्यापूर्वी हे नक्की तपासा!

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
nizamuddin राजधानी दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेमुळे सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला असून, उत्तर रेल्वेने दिल्ली विभागातील अनेक गाड्यांच्या संचालनात बदल केले आहेत. काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर काही गाड्यांच्या वेळापत्रकातही फेरबदल करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन दिवसांत दिल्लीहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासणे आवश्यक आहे.
 
nizamuddin
 
१२ सप्टेंबर रोजी एकूण २६ गाड्यांच्या संचालनात बदल करण्यात आला आहे. यामध्ये १३ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, १३ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे, तर काही गाड्या ठरावीक कालावधीसाठी थांबवून पुढे रवाना केल्या जाणार आहेत. १३ सप्टेंबरलाही रेल्वे प्रवाशांना अशाच प्रकारच्या बदलांना सामोरे जावे लागू शकते. काही गाड्या रद्द होणार असून, काहींचे मार्ग बदलले जातील. तसेच काही गाड्या त्यांच्या नेहमीच्या स्थानकाऐवजी शकूरबस्ती किंवा दिल्ली शाहदरा येथून सुरू होण्याची शक्यता आहे.
 
उत्तर रेल्वेने ब्रिक्स परिषद लक्षात घेऊन दिल्ली विभागातील सुमारे १२० गाड्यांच्या संचालनात बदल केले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी केवळ गाडी रद्द झाली आहे की नाही एवढेच तपासू नये, तर ती नेमक्या कोणत्या स्थानकातून सुटणार आहे, याचीही खात्री करावी. उदाहरणार्थ, एखादी गाडी नेहमी नवी दिल्ली स्थानकातून सुटत असेल; मात्र बदलामुळे ती हजरत निजामुद्दीन स्थानकातून रवाना होऊ शकते. अशा वेळी प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.
 
प्रवासाची माहिती तपासण्यासाठी प्रवाशांनी एनटीईएस अर्थात राष्ट्रीय रेल्वे चौकशी प्रणालीच्या संकेतस्थळाचा वापर करावा. त्यातील ‘ट्रेन एक्सेप्शन इन्फो’ या पर्यायातून रद्द झालेल्या गाड्या, मार्ग बदललेल्या गाड्या आणि नव्या वेळेनुसार धावणाऱ्या गाड्यांची माहिती मिळू शकते. ‘स्पॉट युअर ट्रेन’मध्ये गाडी क्रमांक टाकून किंवा गाडीचे नाव शोधून तिची थेट स्थितीही तपासता येते. याशिवाय गाडीच्या आगमन-प्रस्थानाची वेळ, वेळापत्रक आणि स्थानकावरील सद्यस्थितीची माहितीही मिळू शकते.