वाशीम,
MLA and District Collector पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे जिल्ह्यातील पीक परिस्थिती गंभीर बनली असून, संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि आमदार श्याम खोडे यांनी वाशीम तालुयातील सावरगाव बर्डे, तामसी आणि पंचाळा गावांना भेट देऊन शेतशिवाराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकर्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, तलाठी प्रिया इंगोले, रेणूका ईढोळे यांच्यासह कृषी सहायक,ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते. वाशीम जिल्ह्यातील केवळ ३० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. त्यामुळे शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. गेल्या जवळपास महिनाभरापासून पावसाचा खंड पडल्याने पिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकर्यांनी या कठीण परिस्थितीत घाबरून न जाता थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ आढावा घेतला जात आहे. या परिस्थितीचा सामना आपण सर्वजण एकजुटीने आणि समन्वयाने करूया. शेतकर्यांनी काळजी करू नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन आमदार श्याम खोडे यांनी केले.
पाहणी दौर्यात भाजप शहराध्यक्ष मनीष मंत्री, विनोद पाटील जाधव , सुभाष नानवटे, दत्ता गोटे, तालुकाध्यक्ष एकनाथ कड, रवींद्र ठाकरे, जगदीश देशमुख , गोपाल परांडे ,पांडुरंग कोठाळे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस गोपाल गोटे, दत्तराव गोटे, मोहन गोरे, गजानन कव्हर, माधव कड, माधव कव्हर ग्रामीण परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा अहवाल शासनस्तरावर सादर करून शेतकर्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.