उद्या मान्सून फ्लॉवर शो’चा बक्षीस वितरण समारंभ

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
नागपूर
nagpur-garden-club ’नागपूर गार्डन क्लब’ आणि ’हितवाद’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२४ व्या ’मान्सून फ्लॉवर शो’ आणि ५२ व्या ’इनडोअर आणि हाउस प्लांट शो’ (घरातील व कुंडीतील रोपांचे प्रदर्शन) चा बक्षीस वितरण समारंभ रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सिव्हील लाइन्स येथील नागपूर गार्डन क्लबच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
 
flower show
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून मनपा स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, ’नागपूर गार्डन क्लबच्या अध्यक्षा राजश्री बापट, फ्लॉवर शो कमिटीच्या अध्यक्षा स्वाती गोखले प्रामुख्याने उपस्थित राहतील.
 
कुसुमताई वानखेडे हॉल, उत्तर अंबाझरी रोड, येथे स्व. सौ. कुसुमताई वानखेडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित मॉन्सून फ्लॉवर शोमध्ये प्रामुख्याने इंडोअर आणि हाऊस प्लांट्सचा समावेश होता. यंदाच्या फ्लॉवर शोमध्ये बोन्साय प्लांट्स प्रमुख आकर्षण होते. फ्लॉवर शोमध्ये ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. इंडोअर व हाऊस प्लांट्स, गुलाब, कट फ्लॉवर्स, बोन्साय, पुष्परचना आणि पुष्प सजावट यांच्या सुमारे १ हजार प्रवेशिका सादर झाल्या होत्या. शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि फ्लोरल कार्पेट (फुलांची रांगोळी) स्पर्धा घेण्यात आल्या.