नागपूर,
Nagpur Devotional महानुभाव सेवा संघ, नागपूर तथा व्याख्यानमाला आयोजन समितीतर्फे ‘सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी ते गोविंदप्रभू अवतारदिन’ या निमित्ताने १२व्या वर्षाच्या ‘डॉ. तु. वि.गेडाम स्मृती व्याख्यानमाले’चे आयोजन आजपासून करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला शनिवार, १२ सप्टेंबर ते बुधवार, २३ सप्टेंबरदरम्यान सायंकाळी ५ वाजता कै. रावसाहेब गं. म. ठवरे स्मृती प्रार्थना सभागृह, महानुभाव श्रीपंचकृष्ण मंदिर, राजापेठ बसस्टॉप जवळ, हुडकेश्वर रोड येथे पार पडणार आहे.

व्याख्यानमालेचे उद्घाटन शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारंगधरबाबा पंजाबी (भडगाव) राहतील. अ.भा.म.प. नागपूर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र आमधरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. कोमल ठाकरे प्रमुख वक्त्या राहतील. १० दिवस चालणार्या या व्याख्यानमालेत विविध विषयांवर विचारवंत प्रबोधन करतील. रविवार, १३ सप्टेंबर रोजी पार्थदादा विद्वांस, सोमवार, १४ सप्टेंबरला डॉ. अर्चना ठाकरे, मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी डॉ. पद्मिनी दुरुगकर, बुधवार १६ सप्टेंबर श्रीकृष्णराजबाबा येळमकर, १७ला प्रा. डॉ. भारतभूषणशास्त्री जामोदेकर, १८ला देईगावकरबाबा, १९ रोजी प्रा. सोनाली शास्त्री नागापूरकर, २०ला प्रा. डॉ. स्मिता गोवर्धन सहाणे, २१ रोजी विजयराजदादा नांदगावकर, २२ रोजी प्रणवदादा खंदारकर २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता समारोपीय सोहळा पार पडेल.
याचे अध्यक्षस्थान माहूरपीठाधीश कविश्वराचार्य शीमाहूरकरबाबा भूषवतील. कामठी येथील समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राष्ट्रपाल मेशाम हे समारोपीय व्याख्यान देतील. नागपुरातील महानुभाव पंथीय व पंथीयेतर नागरिक आणि अभ्यासकांनी या ज्ञानसत्राला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महानुभाव सेवा संघ व आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.