नाशिक,
Nashik Newsनाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रामवाडी परिसरात एका शाळेच्या बसचं ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. ब्रेक झाल्यानंतर बसचालकाने प्रसंगावधान राखत बस एका पत्र्याच्या शेडमध्ये वळवली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात ७ ते ८ मूकबधीर मुलं सुखरूप बचावली. पण, या अपघातात एक दुचाकीवरील महिला जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहराच्या रामवाडीतील बायजाबाईच्या छावणी वळणावर दुपारच्या सुमारास ही घटना घडली. शाळकरी मुलांना घेऊन जाणारी शाळेची बस रामवाडीतील बायजाबाईच्या छावणी वळणावर पोहोचली असता अचानक ब्रेक फेल झालं. बसचं ब्रेक फेल झाल्याचं लक्षात येता चालकाने प्रसंगावधान राखत बस थेट गोदापार्कजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये वळवली.
बस शेडमध्ये घुसली आणि जोराची धडक लागून जागेवरच थांबली. या बसमध्ये ७ ते ८ मूकबधिर मुलं होती. मुलांना वाचवण्यााठी चालकाने बस एका पत्र्याच्या शेडमध्ये घुसवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. बस जागेवर थांबली. या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही, मुलांना बाहेर काढण्यात आलं आणि मुलांना रिक्षातून सुरक्षितपणे शाळेत हलवलंय