‘भारत’च्या नेहल पोहाणेची राज्यस्तरावर झेप

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
हिंगणघाट,
Nehal Pohane येथील भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी नेहल अरुण पोहाणे हिने विज्ञान क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्यानंतर तिने जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यातही प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
 
 
Nehal Pohane
 
भारतीय ऊर्जा क्षेत्र - २०४७ या अत्यंत महत्त्वाच्या व संशोधनात्मक विषयावर तिने तयार केलेल्या उत्कृष्ट मॉडेल व प्रभावी सादरीकरण केले. वर्धा येथे पार पडलेल्या या जिल्हास्तरीय मेळाव्यात नेहल पोहाणे हिला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तिच्या यशाबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदास राठी, उपाध्यक्ष श्याम भीमनवार, सचिव रमेश धारकर, मुख्याध्यापक हरीश भट्टड, आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.