८९ गावांमध्ये एक गाव-एक गणपती

बाप्पाच्या स्वागताला भक्त आतुर

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
वर्धा
one-village-one-ganpat जिल्ह्यात आगामी १२ दिवसांच्या गणेशोत्सवाला १४ सप्टेंबरपासून अत्यंत उत्साहात सुरुवात होत आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी वर्धा जिल्हा सज्ज झाला असून जिल्ह्यात २६९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतून गणेशाची स्थापना करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात वेळेवर गणपती विकत आणण्याची प्रथा कमी झाली आहे. आधी मूर्ती बूक करण्यावर गणेश भक्तांचा भर असतो. सार्वजनिक गणेशोत्सवासह घरघुती गणेशस्थापनेसाठी सजावटी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असुन गणेश भक्त आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर झाले आहेत.
 
one ganapati
यंदाच्या गणेशोत्सवावर कोरड्या दुष्काळाचे काळे ढग दाटून आले होते. पावसाने खंड दिल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीत निर्माण झाली होती. जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना दोन दिवसांपासून पावसाचे पुनरागणम झाल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या आनंदातच आता बाप्पाचे आगमण होणार आहे. जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकडून परवानगीसाठी पोलिस ठाण्यामार्फत अर्ज सादर करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे २६९ सार्वजनिक लहान मोठ्या मंडळांना परवानगी दिली आहे.
गणेश उत्सवानिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. १ पोलिस अधीक्षक, १ पोलिस अधीक्षक, १ प्रशिक्षणार्थी एसपी, ४ उपविभागीय पोलिस अधिकारी, १४ पोलिस निरीक्षक, ९६ पोलिस अधिकारी, ९०० गृहरक्षक जवान, ११५० पोलिस अंमलदार, ०२ आरसीपी पथक, १० स्ट्रायकिंग फोर्स तैनात राहणार आहेत. गणेशमूर्ती विक्रीचे दुकानं शहरातील अनेक भागांत लागले आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासुन मातीची मूर्तीच विकत घेण्याकडे गणेश भक्तांचा कल वाढलेला आहे. शोभेच्या वस्तू आणि पूजेचे साहित्य विक्रीचेही दुकानं लागले आहेत. नगर पालिकेने पर्यावरण पुरक गणेेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी नगर पालिकेने दुसर्या दिवसापासूनच विजर्सन कुंडांची शहरात विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे.