नागपूर,
Sub-Junior Sepaktakraw Teamमहाराष्ट्र सब-ज्युनियर सेपकटकरॉ संघाने ५ ते १० सप्टेंबर २०२६ दरम्यान श्रीनगर, जम्मू काश्मीर येथे आयोजित २९ व्या सब-ज्युनियर राष्ट्रीय सेपकटकरॉ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून इतिहास रचला आहे.
या ऐतिहासिक कामगिरीमध्ये, महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय उत्कृष्ट कौशल्य, दृढनिश्चय आणि सांघिक कार्याचे प्रदर्शन करत एकूण सहा पदके २ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कांस्य पदक जिंकले. हे यश खेळाडूंची कठोर मेहनत, शिस्तबद्ध प्रशिक्षण, समर्पण आणि प्रशिक्षक, अधिकारी, पालक व संघटनेच्या सततच्या पाठिंब्याचा परिणाम आहे.
महाराष्ट्र सेपकटकरॉ असोसिएशनचे (एमएसटीए) सचिव डॉ. योगेंद्र पांडे यांनी, संघटनेचे सदस्य विनेय मून, डॉ. अमृता पांडे, डॉ. अमित कंवर आदिंनी संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल प्रचंड आनंद आणि अभिमान व्यक्त केला. संघटनेने सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्यांचे अभिनंदन केले आणि तरुणांना आणखी मोठे यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले. राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील सहा पदकांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्रातील सब-ज्युनियर सेपकटकरॉ नवी उभारी मिळाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र परिवारासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे.