सागवान वस्तूंच्या फिरत्या विक्री केंद्राचे उद्घाटन

माविम व एफडीसीएमचा संयुक्त उपक्रम, महिला सक्षमीकरणासह स्थानिक रोजगाराला चालना

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
चंद्रपूर
teakwood products चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध सागवान वनसंपदा आणि महिलांचे कौशल्य यांची सांगड घालून महिलांना रोजगार व त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र वन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सागवान लाकडापासून निर्मित विविध वस्तूंचे फिरते विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.

sagwan 
 
 
या विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक दिव्य भारती, विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, सहायक विभागीय व्यवस्थापक रुपेश पाटील, वन संरक्षण अधिकारी संभाजी कोंडेवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे उपस्थित होते.
या फिरत्या विक्री केंद्रात सागवान लाकडापासून तयार करण्यात आलेल्या आकर्षक मूर्ती, विविध प्रकारचे फर्निचर, खुर्च्या, टेबल, दरवाजे, कटिंग बोर्ड, मोमेंटो, नेमप्लेट, शोभेच्या वस्तू तसेच विविध कलाकुसरीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. उत्तम दर्जाचे सागवान लाकूड, आकर्षक डिझाईन आणि महिलांच्या कौशल्यातून साकारलेल्या कलाकुसरीमुळे या उत्पादनांना विशेष वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे.
 
या उपक्रमामुळे महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळण्यासोबतच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि महिला बचत गटांच्या लघुउद्योगांना चालना मिळणार आहे. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार सागवान लाकडापासून तयार केलेल्या दर्जेदार वस्तू खरेदी करून महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.