तीन वर्षीय चिमूकलीवर अनैसर्गीक अत्याचार!

गोरेगाव तालुक्यातील घटना , आरोपी गजाआड

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
गोंदिया
unnatural assault घरी खेळण्यासाठी आलेल्या तीन वर्षाच्या चिमूकलीवर एका ५९ वर्षाच्या नराधमाने अनैसर्गीक अत्याचार केल्याची घटना शनिवारी १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील घोटी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या कुटूंबीयांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी आरोपी नराधमाच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यास अटक केली आहे. बुधराम ढिवरू परधोटे (५९) रा. घोटी असे त्या आरोपी नराधमाचे नाव आहे.
 
assoult
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत चिमूकली ही दरदिवशी शेजारील आरोपीची नात हिच्यासोबत खेळण्यासाठी तिच्या घरी जात असे घटनेच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सदर चिमूकली नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी गेली असता आरोपीने तिला जवळ बोलावून तिच्याशी गैरव्यवहार केला. दरम्यान, रात्री लघुशंकेदरम्यान, तिला त्रास जाणवल्याने तिने घडलेल्या प्रकाराविषयी आईला सांगितले. दरम्यान, पिडीतेची आई व कुटूंबीयांनी गोरेगाव पोलिस ठाणे गाठून आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली.
 
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीच्या विरोधात अपराध क्रमांक ६१२/२०२६ कलम ६४ (१), ६५ (२), ३५१ (२), ३५२, सहकलम ६ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपी बुधराम परधोटे यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक वैशाली ढाले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकट पोटे करीत आहेत.