गाडगेनगरात तान्हा पोळा उत्साहात

    दिनांक :12-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Ward No. 28 Gadgenagar प्रभाग क्रमांक २८, गाडगेनगर येथील नवयुवक मंडळातर्फे भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बालगोपालांना दहीकाला वाटप करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना सायकलसह विविध आकर्षक पारितोषिके देण्यात आली. यातील एका सायकलीचा ड्रॉद्वारे विजेता निवडण्यात आला.

raout 
 
 
कार्यक्रमाला महापौर निता ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमाने, शरद वानखडे, गुलाबराव खैरकर व परमेश्वर राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन विनोद वंजारी, राहुल खैरकर, तीर्थ ढोक, राकेश उपाध्याय, राकेश पाटील, राकेश सदोकर व गजानन कांबळे यांनी केले. परीक्षक म्हणून लक्ष्मीकांत कातोरे, कमलाकर मानमोडे, नितीन बर्गे व चंद्रकांत साटकर यांनी काम पाहिले.
सौजन्य :परमेश्वर राऊत,संपर्क मित्र