समुद्रपूर,
wardha chandrapur forest department तालुक्यातील पवनगाव (करुळ) परिसरात वाघाने दहशत निर्माण केली असून अनेक जनावरांना ठार केले. ८ सप्टेंबरला विशाल मून याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. तर ९ रोजी पीक सर्वेक्षणासाठी गेलेल्या दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आ. समीर कुणावार यांनी यासंबंधी वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून त्या वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
या वाघिणीच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वर्धा वनविभागासह चंद्रपूर जिल्ह्यातील पथक युद्ध पातळीवर प्रयत्न आहेत. वाघिणीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे तसेच वनविभागाच्या वतीने रात्रंदिवस पेट्रोलिंग करुन शेतकरी व शेतमजूर नागरिकांमध्ये जनजागृती करून सर्तक रहण्याचे आवाहन करण्यात आलेे आहे. आ. कुणावार या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.
८ सप्टेंबरला पवनगाव येथील विशाल मून याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले तर दुसऱ्या दिवशी ९ सप्टेंबरला गावातील कोतवाल कैलास बहादुरे व सुधीर साबळे हे शेतात पीक सर्वेक्षणासाठी गेले असताना वाघ समोर आला मात्र दोघांनीही प्रसंगावधान राखल्यामुळे थोडक्यात बचावले. उपवनसंरक्षक हरविर सिंग यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसरक्षक हरीष सरोदे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे यांनी वाघाला पकडण्यासाठीकरिता आवश्यक हालचाली सुरू केल्या असून पवनगाव (करुळ) परिसरात मोठ्या प्रमाणात वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभागाचे अधिकारी कर्मचारी तळ ठोकून असून ड्रोनच्या माध्यमातून वाघाची पाहणी केली जात आहे.