वाशीम,
washim news गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आणि खासगी बस वाहनांच्या मनमानी भाडेवाढीवर वेसण घालण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशीम अॅशन मोडवर आले आहे. खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी ११ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे.

शासन निर्णयानुसार खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांना संबंधित मार्गावरील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस भाड्यापेक्षा कमाल ५० टयांपेक्षा जास्त भाडे आकारण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे सर्व खासगी बस वाहतूकदारांनी शासनाने ठरवून दिलेल्या कमाल मर्यादेतच भाडे आकारणी करावी, असे स्पष्ट निर्देश परिवहन विभागाने दिले आहेत. मोहिमेदरम्यान उप प्रादेशिक परिवहन अधिकार्यांचे पथक रस्त्यावर उतरून वाहनांची कडक तपासणी करणार आहे. यात प्रामुख्याने ऑनलाईन आरक्षित तिकिटे आणि प्रत्यक्ष आकारलेले भाडे यामध्ये तफावत आढळल्यास कारवाई. वाहनातील आपत्कालीन यंत्रणा, अग्निशामक यंत्रणा, पॅनिक बटण, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र . क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे आणि परवान्यातील अटींचा भंग करणे.
खासगी बस वाहतूकदारांनी प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी भाडेतक्ता स्पष्टपणे प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. प्रवाशांनीही तिकीट खरेदी करताना दर तपासून घ्यावेत. प्रवाशांची सुरक्षितता आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सर्व नागरिक आणि बस वाहतूकदारांनी परिवहन विभागाच्या या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशीम यांच्या वतीने करण्यात आले आहे.