भोपाळ-दिल्ली एअर इंडिया फ्लाइटचे जयपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग

मोठा अपघात टळला

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
भोपाळ,
emergency landingभोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या A-1886 या विमानाचे जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान दिल्लीऐवजी जयपूरकडे वळवण्यात आल्यानंतर ते सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती आहे.
 
landing
या विमानाची भोपाळहून सकाळी ८.२५ वाजता उड्डाणाची निर्धारित वेळ होती. मात्र, विमानाने सकाळी ८.४७ वाजता उड्डाण केले. हे विमान सकाळी ९.५५ वाजता दिल्लीला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, प्रवासादरम्यान विमान दिल्लीऐवजी जयपूरकडे वळवण्यात आले.
 
विमान सकाळी सुमारे ८.३६ वाजता जयपूरच्या दिशेने वळले आणि अंदाजे ९.४० वाजेपर्यंत जयपूर विमानतळावर पोहोचले. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
विमानात नेमकी कोणती तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि ते जयपूरकडे वळवण्याची गरज का भासली, याचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, विमानाच्या आपत्कालीन लँडिंगमुळे मोठा अपघात टळला.
 
दरम्यान, या घटनेनंतर ग्राउंड स्टाफ आणि एअरलाइनच्या तांत्रिक पथकाने विमानाची तपासणी सुरू केली आहे. इंजिनमध्ये बिघाड आढळल्यानंतर पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि विमानाचा मार्ग जयपूरच्या दिशेने वळवण्यात आल्याची माहिती आहे.