मंगरूळनाथ,
mangrulnath मंगरूळनाथ तालुक्यातील शेलूबाजार येथील प्रतिष्ठित समाजसेवी व व्यावसायिक गोठी कुटुंबावर रविवारी दुःखाचा डोंगर कोसळला कुसुमबाई गोठी (वय ६५) यांचे शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अवघ्या १७ तासांच्या अंतराने त्यांचे पती विजय गोठी (वय ६९) यांचेही रविवार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता निधन झाले.

पती-पत्नीच्या अवघ्या काही तासांच्या अंतराने झालेल्या निधनाची बातमी समजताच शेलूबाजार परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे गोठी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांमध्ये शोककळा पसरली. दोघांचीही अंत्ययात्रा रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या शेलूबाजार येथील खासगी निवासस्थानापासून हिंदू स्मशानभूमीकडे काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, नातेवाईक व परिचित उपस्थित होते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात त्यांच्या मुलाने हिंदू धार्मिक विधीनुसार आई-वडिलांना मुखाग्नी दिला. एकाच कुटुंबातील पती-पत्नीचे इतक्या कमी कालावधीत निधन झाल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. ईश्वर दिवंगत कुसुमबाई गोठी व विजय गोठी यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि गोठी कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.