इराणचे राष्ट्राध्यक्ष संतांच्या चरणी नतमस्तक! VIDEO

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
President of Iran paid a visit to the saints दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पेझेश्कियान हे जगद्गुरू सतीशचार्य यांची भेट घेतल्यानंतर नतमस्तक होत त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसत आहेत. संस्कृती आणि आध्यात्मिक परंपरेप्रती आदर व्यक्त करणाऱ्या या प्रसंगाची चर्चा सुरू झाली आहे.
 
 
President of Iran paid a visit to the saints
 
 
पेझेश्कियान यांच्या भारत दौऱ्यादरम्यान त्यांनी धार्मिक नेते, उद्योगपती आणि विचारवंतांशी संवाद साधला. याच पार्श्वभूमीवर जगद्गुरू सतीशचार्य यांच्यासोबत त्यांची विशेष भेट झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये दोघांमध्ये संवाद झाल्यानंतर पेझेश्कियान यांनी जगद्गुरूंच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याचे दिसते. या कार्यक्रमाला धर्म संसदेचे अध्यक्ष महामंडलेश्वर गोस्वामी सुशीलजी महाराज आणि पतंजली योगपीठाचे आचार्य बाळकृष्ण हे देखील उपस्थित होते.
 
 
 
या भेटीदरम्यान धर्म, मानवता आणि आध्यात्मिक मूल्यांवरही चर्चा झाली. जगद्गुरू सतीशचार्य यांनी सनातन परंपरा संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देते आणि सर्वांना एका कुटुंबाप्रमाणे पाहते, असे सांगितले. धर्म माणसांना एकत्र राहण्याची शिकवण देतो, असेही त्यांनी नमूद केले. दुसरीकडे, पेझेश्कियान यांनी धर्म आणि धार्मिक शिकवणींचा मूलभूत उद्देश मानवतेचे रक्षण करणे आणि न्यायव्यवस्था प्रस्थापित करणे हा असल्याचे सांगितले. सर्व जीवांमध्ये सद्भावना असण्याचा संदेशही या संवादातून देण्यात आला. दरम्यान, पेझेश्कियान यांनी अबू धाबीचे युवराज खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांचीही भेट घेतली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर दोन्ही नेत्यांची ही पहिली भेट असल्याचे सांगण्यात आले आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने झालेल्या विविध भेटी आणि संवादांमध्ये हा प्रसंग विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.