महसूलमंत्र्यांचा आदेश अन् जिल्हाधिकारी दौऱ्यावर

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
वर्धा,
chandrashekhar bawankule महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, १२ सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दुष्काळ प्रभावित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्याचा दौरा करून अहवाल सादर करण्याचे आवाहन केले. त्यानुसार रविवारी, १३ सप्टेंबरला जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील मंडळांचा दौरा केला.
 
 
chandrashekhar bawankule
 
महसूलमंत्री बावनकुळे यांनी दुष्काळ प्रभावित जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत व्हीसीद्वारे आढावा सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार रविवार, १३ रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका व महसूल मंडळांमध्ये जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी भेट देऊन मंडळातील पिकांची स्थिती, पावसाची परिस्थिती, मध्यम / लघु प्रकल्प, तलाव यातील पाणीसाठा याबाबत पाहणी केली. या दौऱ्यात शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या दौऱ्याचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिली.