सलमानचा घरच्यांना रिअॅलिटी चेक!

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
मुंबई,
Salman reprimanded the contestants. ‘बिग बॉस २०’चा पहिला ‘वीकेंड का वार’ चांगलाच रंगला. सूत्रसंचालक सलमान खानने आपल्या खास अंदाजात स्पर्धकांशी संवाद साधत पहिल्या आठवड्यात घरात घडलेल्या घटनांचा आढावा घेतला. सुरुवातीला वातावरण हलकेफुलके ठेवत सलमानने काजीचे कौतुक केले आणि त्याला ‘रॉकस्टार’ अशी उपाधी दिली. तसेच काजीला घरातील सर्व सदस्यांना त्याची खास नृत्याची स्टेप शिकवण्यास सांगितले. सलमानने स्वतः ही स्टेप केलीनाही, मात्र ‘यंग डीएसए’ला काजीची रॉकस्टार स्टेप करण्यासाठी सर्वोत्कृष्ट परफॉर्मर ठरवण्यात आले.
 
 

haiwan 
 
दरम्यान, आसिफ खान आणि अमन गांधी यांच्यात झालेल्या तीव्र वादामुळे घरातील वातावरण चांगलेच तापले. वादादरम्यान आसिफने अमनला ‘जाहिल’ म्हटल्याने प्रकरण चिघळले. अमननेही त्याला प्रत्युत्तर देताना ‘एक्सपायर्ड चाट मसाला’ अशी टिप्पणी केली. एवढ्यावरच न थांबता अमनने आसिफला ‘छिछोरा’ असेही म्हटले. या शाब्दिक संघर्षामुळे दोघांमधील तणाव वाढला. ‘पंचायत’ फेम आसिफने अमनला घराबाहेर भेटण्याची धमकी दिल्याने हा वाद आणखी चर्चेत आला.
 
 
यानंतर सलमानने घरातील इतर सदस्यांनाही त्यांच्या खेळावरून आरसा दाखवला. त्याने एका गायकाचे कौतुक करत चांगला काळ असो किंवा कठीण परिस्थिती, स्वतःवर सातत्याने मेहनत करण्याचा सल्ला दिला. यासाठी सलमानने बॉबी देओलच्या कारकिर्दीचे उदाहरण देत त्याच्या प्रवासातून प्रेरणा घेण्यास सांगितले. त्यानंतर सलमानने अरिश्फा खानशी संवाद साधला. ती घरात लहान मुलासारखी वागत असल्याचे लक्षात घेत सलमानने विनोदी शैलीत तिला ‘चाइल्ड कार्ड’चा फायदा घेण्याचा सल्ला दिला. ‘प्रत्येकजण व्हिक्टिम कार्ड खेळतो, तू चाइल्ड कार्ड खेळ’, असे सलमानने म्हटले.