कारंजा (घा.) येथेमहाराष्ट्र देवस्थान समितीची राज्यस्तरीय विश्वस्त महापरिषद

    दिनांक :13-Sep-2026
Total Views |
कारंजा (घा.),
Maharashtra Devasthan Committee at Karanja मंदिर संस्कृतीचे रक्षण व संवर्धन, देवस्थान इनाम जमिनींचे संरक्षण, मंदिरांचे पारदर्शक व प्रभावी व्यवस्थापन तसेच मंदिर विश्वस्तांना संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र देवस्थान समिती, वर्धा जिल्हा यांच्या वतीने स्थानिक मन्नालाल मातादिन धर्मशाळा येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीला महाराष्ट्र देवस्थान समितीचे निलेश टवलारे, पिंगळादेवी संस्थानचे आशिष मारुडकर, राम प्रांजळे, कैलाशकुमार पनपालिया, रवींद्र भोयर, विजय करडे, धनराज वेलनकर, कृष्ण माहोरे, कैलाश गिरोळकर आदी उपस्थित होते.
 
 
मंदिरांच्या विविध समस्या, देवस्थान इनाम जमिनी, महसूल नोंदी, मंदिर प्रशासन, कायदेशीर अडचणी, धार्मिक उपक्रम तसेच मंदिरांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटितपणे काम करण्याच्या विविध विषयांवर, मंदिरांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ३ ऑक्टोबर रोजी एकवीरा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र देवस्थान समितीच्या विश्वस्त महापरिषदेबाबत सविस्तर माहिती दिली. कारंजा घाडगे तालुक्यातील विविध मंदिरांच्या समस्या व विश्वस्तांच्या सूचना यांची सविस्तर मांडणी करण्यात आली. प्रत्येक विषयावर सकारात्मक व चर्चात्मक वातावरणात विचारविनिमय करण्यात आला. मंदिरांच्या प्रश्नांवर भविष्यात तालुका व जिल्हास्तरावर संघटितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
 
बैठकीला कारंजा घाडगे तालुक्यातील मनोहर डोबाळे संत प्रेम बाबा महाराज, अमित मारोटकर, पुष्पा विनायक लोखंडे, पंडित मल्लेवार जगद्गुरु राजेश्वर महाराज, संदीप बोदडे हेमंत गाखरे, प्रमोद हिंगवे, बैठकीस कारंजा घाडगे तालुक्यातील १२५ हून अधिक मंदिर विश्वस्त, संस्थानांचे अध्यक्ष, पदाधिकारी, पुजारी, सेवेकरी तसेच धर्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.