मध्यवर्ती बसस्थानकावरील पाकीट चोरीची उकल

३८ हजार ५०० रुपयांसह आरोपी जेरबंद

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
अकोला
akola bus stand बस च्या प्रतीक्षेत असलेल्या एका प्रवाशाच्या खिशातून पन्नास हजार रुपये लंपास केल्या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसात दाखल गुन्ह्याची यशस्वी उकल करण्यात आली असून ३८ हजार ५०० रुपयांची रक्कम जप्त करून आरोपीला जेरबंद करण्यात आले.
 

akola bus stand 
फिर्यादी आत्माराम ज्ञानेश्वर ब्राह्मण वय ४९ वर्षे, रा. सुधीर कॉलनी, रेवी नगर, अकोला हे २०२६ रोजी सायंकाळी बसस्थानकावर बसची वाट पाहत असताना त्यांच्या खिशातील सुमारे ५० हजार रुपये रोख रक्कम असलेले पाकीट अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावरून पोलीस स्टेशन सिव्हील लाईन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेतला. चौकशीअंती शेख वकील शेख हाफिज वय २५ वर्षे, रा. रऊफनगर, सोहेल टॉवर प्लॉट, अकोला यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सदर चोरीची कबुली दिली.आरोपीच्या अंगझडती व घरझडती दरम्यान चोरी गेलेल्या रकमेपैकी ३८ हजार ५०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, एसडीपीओ सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मालती कायटे यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल प्रदीप रिसासट, प्रदीप पवार, यादव यांनी कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.