एलेना रायबाकिना प्रथम विश्वमानांकनपदावर आरूढ

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |

 

न्यू यॉर्क
wta-rankings सोमवारी जाहीर झालेल्या डब्ल्यूटीएच्या अद्ययावत मानांकनानुसार, बेलारूसच्या आर्यना सबालेन्का हिला मागे टाकत एलेना रिबाकिना अधिकृतपणे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.
 
elena

अलीकडेच पार पडलेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत किनवेन झेंगचा पराभव केल्यावरच एलेना रायबाकिनाचे अव्वल स्थान निश्चित झाले होते; त्यानंतर तिने अंतिम सामन्यात सबालेन्काचा पराभव करीत या यशावर शिक्कामोर्तब केले.

 
महिला एकेरी मानांकनात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचणारी एलेना रायबाकिना ही कझाकस्तानची (पुरुष किंवा महिला गटातील) पहिलीच खेळाडू ठरली आहे. संपूर्ण हंगामात तिने सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी केली, तर दुसरीकडे बेलारूसची टेनिस स्टार सबालेन्काच्या कामगिरीत हंगामाच्या मधल्या काळात काहीशी घसरण झाली होती.

 

हा इतिहास आहे आणि कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करताना मला खूप अभिमान वाटतो, असे एलेना रायबाकिना म्हणाली. मी कधीच विचार केला नव्हता की मी व्यावसायिक खेळाडू बनेन किंवा अशा मोठ्या व्यासपीठांवर आणि स्पर्धांमध्ये खेळेन, असेही तिने नमूद केले.