अकोला
ganesh chaturthi 2026 विघ्नहर्ता बाप्पांचे आगमन सोमवारी होणार असून भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांचीही तयारी पूर्ण झाली असून घरोघरी देखील बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. रविवारी गणेश मूर्ती घेण्यासाठी बाजारपेठेत भक्तांनी गर्दी केली होती. रिमझिम पावसात देखील भक्तांचा उत्साह दिसून आला. महापालिकेच्या एक खिडकी मोहिमे ३१५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगी घेतली.
सोमवारी हरितालिका व श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी आहे. शिवाय गेल्या दीड महिन्यांपासून पावसाचा खंड होता मात्र पावसाचे आगमन झाल्याने बाजारपेठेत रविवारी नवचैतन्य दिसून आले. पूजेसाठी लागणाऱ्या विविध वनस्पती, फुलं , पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारात झुंबड होती तर अकोला क्रिकेट क्लब मैदानासह शहराच्या विविध भागात गणपतीच्या मुर्त्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या. रिमझिम पावसात देखील भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.यंदा सलग बारा दिवस गणेशोत्सव साजरा होणार असून लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.