शिक्षक आणि संशोधकांनी स्वतःची लेखनशैली विकसित करावी : आचार्य सिंह

साहित्यिक चोरी : ओळख, प्रतिबंध आणि बचाव यावर व्याख्यान

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
वर्धा,
Informtive lectureशिक्षक आणि संशोधकांनी संशोधन लेख, प्रबंध, पुस्तके किंवा लेखनासाठी स्वतःची स्वतंत्र लेखनशैली विकसित करावी. तसेच साहित्यिक चोरीपासून दूर राहण्याचे आवाहन इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली येथील शिक्षण विभागाचे आचार्य प्रा. गौरव सिंह यांनी केले. येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात ‘साहित्यिक चोरी : ओळख, प्रतिबंध आणि बचाव’ या विषयावर आयोजित ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते.

teachers 
प्रा. सिंह पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या युगात विविध स्त्रोतांमधून साहित्यिक चोरी करून ती स्वतःच्या नावाने प्रकाशित करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. शैक्षणिक क्षेत्रात हे गंभीर गैरप्रकार मानले जातात. दुसर्यांचे विचार स्वतःच्या नावाने प्रकाशित करणे किंवा त्यांचा मूळ स्त्रोत लपविणे हे देखील साहित्यिक चोरीच्या कक्षेत येते. यापासून बचाव करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. साहित्यिक चोरीचा इतिहास सुमारे २२०० वर्षांपूर्वीचा असला तरी आज प्रकाशित, अप्रकाशित, मुद्रित तसेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील साहित्य, शब्द, वाक्ये किंवा इतरांचे लेखन मूळ लेखकाची परवानगी न घेता स्वतःच्या नावाने प्रकाशित करण्याच्या घटना वाढत आहेत. शैक्षणिक प्रामाणिकता आणि नैतिकता जपण्यासाठी अशा प्रकारांपासून दूर राहणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. साहित्यिक चोरी शोधण्यासाठी उपलब्ध सॉफ्टवेअरची माहिती देताना त्यांनी या विषयावर नियमित जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली.
 
कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांच्या संरक्षकत्वाखाली संशोधन व विकास प्रकोष्ठच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, ओडिशा, दिल्ली, जम्मू-काश्मीर, तेलंगणा आदी राज्यांतील २९ संस्थांमधून सहभाग नोंदविण्यात आला. यामध्ये ८ केंद्रीय विद्यापीठे आणि १७ राज्य विद्यापीठांतील १०० हून अधिक शिक्षक, संशोधक आणि विद्याथ्र्यांनी नोंदणी करून सहभाग घेतला.