धारणी
mahavitaran मेळघाटातील वीज समस्या सर्वांसाठी परिचयाची आहे. अनेक वर्षा पासून काही गावात परंपरागत विद्युती प्रवाह नाही. अनेक गावात सौर ऊर्जेद्वारे वीज उपलब्ध करण्यात आली पण अडचणी नेहमी येतातच. आता शासनाने महावितरणच्या ग्राहक तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी रमेश मावस्कर ह्यांची नियुक्ती केल्याने समस्यांच्या निवारणाचा श्रीणेशा केलेला आहे. आता वीज समस्येच्या कायम निदानाचा मार्ग मोकळा झालेला आहे.
माजी पुरवठा उपायुक्त आणि आदिवासींच्या सेवेसाठी शासकीय नोकरी सोडून सरळ राजकारणात आलेले अनुभवी रमेश पटल्या मावस्कर ह्यांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने अमरावती ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्षपदी नियुक्त दिली आहे. रमेश यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रमेश मावस्कर हे २०१९ विधानसभा निवडणुकीत मेळघाटातून भाजपाचे उमेदवार होते.
आयोगाचे संयुक्त संचालकांनी अमरावती परिमंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा रमेश मावस्कर यांना देतानाच यवतमाळचा प्रभार सुद्धा दिलेला असल्याने जबाबदारी वाढलेली आहे. रमेश मावस्कर हे भेलचे संचालक पण आहेत, त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा लाभ आदिवासी जनतेला मिळावा या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी या नियुक्तीला प्राधान्य दिल्याची माहिती आहे.