गणेशोत्सवात महाप्रसादासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरची सक्ती

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
वर्धा
gas cylinde गणेशोत्सवात सार्वजनिक उत्सवांमध्ये विविध मंडळांद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद व भोजनासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर रोखण्यासाठी आणि संभाव्य भीषण अपघात टाळण्यासाठी वर्धा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना कडक निर्देश दिले आहेत.
 
gas
अनेक गणेश मंडळांमध्ये महाप्रसाद तयार करताना घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करतात. घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक किंवा सार्वजनिक कामासाठी वापर करणे हा जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा आहे. अपघात झाल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात. सार्वजनिक गणेश मंडळ व इतर संस्थांना मंडप, ध्वनी किंवा महाप्रसादाची परवानगी देताना केवळ व्यावसायिक सिलेंडरचाच वापर करणे बंधनकारक राहील, ही अट स्पष्टपणे समाविष्ट केली जाईल.
तहसीलदारांनी आपल्या तालुक्यातील गणेश मंडळांना सूचित करून केलेल्या कारवाईचा अहवाल तत्काळ जिल्हा कार्यालयास सादर करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे यांनी दिले आहेत.