‘मी आत्महत्या करत आहे’

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
मुंबई
vikas samudre शुक्रवारी रात्री प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते विकास समुद्रे यांच्या फेसबुक अकाऊंटवरून समोर आलेल्या एका धक्कादायक पोस्टने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. “मी आत्महत्या करत आहे…” असा मजकूर असलेली ही पोस्ट काही वेळातच ऑनलाइन वेगाने व्हायरल झाली. एका व्यक्तीच्या आयुष्याशी थेट संबंधित असलेले हे प्रकरण असल्याने मुंबई सायबर पोलिसांनी तातडीने दखल घेत तपासाला सुरुवात केली.
 

marathi actor vikas samudre safe after suicide post sparks police alert 
ही पोस्ट व्हायरल होताच मुंबई पोलीस आयुक्तांसह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन येऊ लागले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलीस सायबर लॅब, पाच सायबर अधिकारी आणि नियंत्रण कक्षातील कर्मचारी तात्काळ कामाला लागले. विकास समुद्रे नेमके कुठे आहेत, याचा शोध घेऊन शक्य तितक्या लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचणे, हे पोलिसांसमोरील प्रमुख उद्दिष्ट होते.
मुंबई सायबरचे डीसीपी बजरंग बनसोडे यांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने तपासात कोणताही विलंब करण्यात आला नाही. संपूर्ण टीमने ऑनलाइन मेटाडेटा आणि प्रगत तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून अभिनेत्याचे ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. समुद्रे यांचे नेमके लोकेशन आणि संबंधित तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी सायबर विंगने आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली.
तांत्रिक तपास आणि इंटरनेटवरील vikas samudre शोधाच्या माध्यमातून सायबर टीमला अखेरीस विकास समुद्रे यांचा वैयक्तिक संपर्क क्रमांक मिळवण्यात यश आले. पोलिसांनी कोणताही वेळ न दवडता त्या क्रमांकावर संपर्क साधला. रात्री ठीक १२ वाजून १५ मिनिटांनी पोलिसांचा अभिनेत्याशी थेट संपर्क झाला. फोनवर सर्वप्रथम अधिकाऱ्यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यावेळी विकास समुद्रे यांनी आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.संभाषणादरम्यान विकास समुद्रे यांनी पोलिसांना सांगितले की, ते त्यावेळी एका नाटकाच्या प्रोजेक्टवर काम करत होते. या प्रोजेक्टची स्क्रिप्ट आणि सोशल मीडिया पोस्ट तयार करत असताना त्यांच्याकडून नकळत टायपिंगची चूक झाली आणि निष्काळजीपणामुळे ती पोस्ट सार्वजनिक झाली. या प्रकारामागे कोणतेही अनुचित किंवा हेतुपुरस्सर कृत्य नसून, ही केवळ मानवी चूक असल्याचे त्यांनी पोलिसांना स्पष्ट केले.या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर मुंबई सायबर पोलिसांनी आपला तपास पूर्ण केला.