मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानला ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
नागपूर
‘maharashtra gaurav मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूर या संस्थेला ग्लोबल फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव’ संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, याच सोहळ्यात प्रतिष्ठानच्या तब्बल ११ सदस्यांनाही त्यांच्या साहित्यिक व कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 

maymarathi nakshatra pratishthan nagpur receives ‘maharashtra gaurav’ award, 11 members also honoured 
वाई (जि. सातारा) येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या रमेश गरवारे सभागृहात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात चित्रपट अभिनेता व ‘लागिरं झालं जी’ मालिकेचे निर्माते तेजपाल वाघ, ‘देऊळ बंद’ चित्रपटातील अभिनेता अतुल कुडदे, वाईचे वैभव डॉ. मोशीन पठाण, विद्यानिकेतन फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यजित माने, शशिकांत कोचळे आणि ग्लोबल फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष प्रा. विजया मारोतकर, सचिव मंगेश बावसे, कोषाध्यक्ष डॉ. माधव शोभणे आणि डॉ. राजेश काळे यांनी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ स्वीकारला.
११ साहित्यिकांचाही गौरव
याच सोहळ्यात प्रतिष्ठानच्या ११ सदस्यांना त्यांच्या व्यक्तिगत योगदानासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मंगेश बावसे यांना ‘कलारत्न’, डॉ. माधव शोभणे, डॉ. अरविंद बुटले आणि विजय मेश्राम यांना ‘जीवनदीप’, प्रा. नरेंद्र पोद्दार, डॉ. राजेश काळे, प्रणोती कळमकर आणि डॉ. मोनाली पोफरे यांना ‘लेखन गौरव’, तर डॉ. पद्मिनी दुरुगकर, स्मिता किडिले आणि अरुणा कडू यांना ‘ज्ञानदीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.