icc-taught-a-lesson-to-pak टीम इंडियाविरुद्ध पंगा घेणाऱ्या मोहसिन नक्वी यांना आयसीसीने 12 तासात धडा शिकवला आहे. बीसीसीआयच्या वॉर्निंगनंतर देखील मोहसिन नक्वी यांनी पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनला हजेरी लावली होती. टीम इंडियाचा ट्रॉफी न दिता नक्वी निघून गेले. इंग्लंडविरुद्ध बर्मिंघम येथील एजबॅस्टन मैदानात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात स्लो ओव्हर-रेट ठेवल्याबद्दल पाकिस्तान टीमवर आयसीसीकडून दुहेरी कारवाई करण्यात आली आहे.
निर्धारित वेळेचा विचार केल्यानंतर पाकिस्तान टीम तब्बल 11 ओव्हर्स मागे असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे पाकिस्तान टीमच्या सर्व खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतून त्यांचे 11 पॉईंट्स कापण्यात आले आहेत.
या मोठ्या पेनल्टीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टेबलमध्ये सर्वात शेवटी असलेल्या पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. 11 पॉईंट्स कमी झाल्याने पाकिस्तान टीम सध्या 4.63 पॉईंट पर्सेंटेजसह 9 व्या क्रमांकावर फेकली गेली आहे.