मान्सून फ्लॉवर शो’चा बक्षीस वितरण समारंभ

वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनावर भर देण्याची गरज मनपा स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
नागपूर,
nagpur garden club भविष्यातील पर्यावरण संरक्षण, जलसंधारण आणि हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी विविध ठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे. नागपूर शहराला स्वच्छ व हिरवे शहर म्हणून कायम राखण्यासाठी मनपाकडून वृक्षारोपण अभियान वेगाने राबविले जात आहे. वृक्षारोपणासोबतच त्यांच्या दीर्घकालीन जतन व संवर्धनावर भर देण्यासाठी नागपूर गार्डन क्लबने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट प्रतिपादन मनपा स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी केले.
 

nagpur garden club 
 
 
सिव्हिल लाईन्स येथील नागपूर गार्डन क्लबच्या प्रांगणात 'नागपूर गार्डन क्लब' आणि 'हितवाद'च्या वतीने आयोजित १२४ व्या 'मान्सून फ्लॉवर शो' आणि ५२ व्या 'इनडोअर आणि हाऊस प्लाण्ट शो' (घरातील व कुंड्यांमधील रोपांचे प्रदर्शन) च्या बक्षीस वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रामुख्याने नागपूर गार्डन क्लबच्या अध्यक्षा राजश्री बापट, फ्लॉवर शो कमिटीच्या अध्यक्षा स्वाती गोखले, अनुजा परचुरे, गुलाब महंत, नितीन दाते, पद्मा देशराज, समित आदमने, प्रशांत तेलंग आदी उपस्थित होते.
स्वयंस्फूर्तीने जबाबदारी स्वीकारा
वृक्षारोपणाचे कार्यक्रम ठिकठिकाणी घेतल्यानंतर या सर्व झाडांना पाणी देऊन त्यांना जगवण्यासाठी त्या त्या भागातील संस्था, व्यक्ती, सरकारी यंत्रणा, कंपन्या आणि पर्यावरणप्रेमींनी स्वयंस्फूर्तीने जबाबदारी स्वीकारल्यास हरित अभियान यशस्वी होईल, असा विश्वास शिवानी दाणी-वखरे यांनी व्यक्त केला.
 
मानसिक तणाव कमी करण्यास मदत
नागपूर गार्डन क्लबच्या अध्यक्षा राजश्री बापट आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या, धावपळीच्या युगात अनेकांना सतत तणवाचा सामना करावा लागतो. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने अनेक गोष्टींवर मात करता येते. फुल झाडांनी स्वतः फुलवेल्या बागेत आपण काही वेळ घालविल्यास दिवसभरातील मानसिक तणाव कमी करण्यास मोलाची मदत होते.nagpur garden club मुख्यत: फूल झाडांच्या सान्निध्यात राहिल्याने खरे समाधान मिळते.
रौप्य महोत्सवी चॅलेंज ट्रॉफी रेखा देशमुख यांना प्रदान
कुसुमताई वानखेडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित मान्सून फ्लॉवर शोमध्ये प्रामुख्याने इनडोअर आणि हाऊस प्लाण्ट्सचा समावेश होता. यंदाच्या फ्लॉवर शोमध्ये बोन्साय प्लाण्ट्स प्रमुख आकर्षण होते. इनडोअर व हाऊस प्लाण्ट्स, गुलाब, कट फ्लॉवर्स, बोन्साय, पुष्परचना आणि पुष्प सजावटीच्या एक हजार प्रवेशिका सादर झाल्या होत्या. इनडोअर व हाऊस प्लांट्स प्रदर्शनात एकत्रितपणे सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल नागपूर गार्डन क्लब ‘रौप्य महोत्सवी’ चॅलेंज ट्रॉफी शिवानी दाणी-वखरे यांच्या हस्ते रेखा देशमुख यांना प्रदान करण्यात आली. याशिवाय विविध गटात पुरस्कार देण्यात आले. यात गुरप्रीत सिंग, नदीम रहमान, एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड उमरेड, लोक भवन, व्हीएनआयटी, विवान भंडारी, लुकेश वरहोकर, अवंती मुंडले, वैशाली जंगले, गौरी गवते, चंद्रकांत भन्नारे, चंचल सिंग रेणू, अश्विनी बापट, नयनतारा भंडारी, रुपाली मिलमिले, कुमुद नटराजन, संध्या मेश्राम, दीपक लयबर, विष्णम जंगले, चंद्रकांत जांगीड, सुनील पाठक, वर्षा पटवर्धन, मितेश साहू यांना सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी नितीन दाते, माधुरी देव, सुप्रिया नवरे, केदार गोखले, आरती राजकोंडावार, तन्मय गोडघाटे आदींनी परिश्रम घेतले.