पावसाचे पुनरागमन अन् बाप्पा विराजमान

दिवसभर ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
वर्धा
ganapati aagman दीर्घकाळ पावसाने खंड दिल्याने सण-उत्सवांवर निरुत्साह पसरला होता. पण नंदी पोळ्याच्या दिवसापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावताच गौरी-गणपतीच्या सणाचा उत्साह संचारला आहे. आज, सोमवारी लाडक्या गणरायाचं ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि मोरयाच्या जयघोषात घरोघरी व गणेश मंडळांत आगमन झालं आहे. रविवारी सायंकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत बाप्पाला मंडपात नेण्यात आलेे.
 
bappa aagaman
शहरातील कुंभारपुरा, बॅचलर रोड, साई मंदिर रोड, मगन संग्रहालय परिसरात गणेश मूर्ती विकत घेण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची लगबग पाहायला मिळाली. दोन दिवस पाऊस असल्याने आज गणेश स्थापनेलाही पाऊस राहील, अशी भीती होती. परंतु, आज सकाळपासून आकाश निरभ्र होते. कमी पावसाअभावी जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. येत्या चार-आठ दिवसांत पाऊस न पडल्यास तोंडी आलेला घास हिरावणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकरी दररोज देवाकडे पावसासाठी प्रार्थना करीत होते. बळीराजाची साद ऐकत गणपती बाप्पाने विराजमान होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळाली.
बहुतांश नागरिकांनी बाप्पाच्या मूर्ती आधीच बुकिंग करून ठेवल्याने रविवारीच घरी नेल्या होत्या. गौरी-गणपतीनिमित्त बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली आहे. यामुळे आज सकाळपासून बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड दिसून आली. गणेश मंडळांसह काही नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला घरी नेले. भाविक डोक्यावर, ऑटोतून, दुचाकीने, कारमधून बाप्पाला नेत होते. सायंकाळपर्यंत घरोघरी भक्तिभावात बाप्पाची स्थापना करण्यात आली. यावर्षी १२ दिवस चालणाऱ्या या उत्सवात धार्मिक 
पर्यावरणपुरक गणेेशोत्सवाचे आवाहन
जिल्ह्यात सायंकाळपर्यंत २६९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतून गणेशाची स्थापना झाली. गणेश उत्सवानिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त असून पोलिस अधीक्षक, प्रशिक्षणार्थी एसपी, ४ उपविभागीय पोलिस अधिकारी, १४ पोलिस निरीक्षक, ९६ पोलिस अधिकारी, ९०० गृहरक्षक जवान, ११५० पोलिस अंमलदार, २ आरसीपी पथक, १० स्ट्रायकिंग फोर्स तैनात राहणार आहेत. नगरपालिकेने पर्यावरणपुरक गणेेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी नगरपालिकेने दुसऱ्या दिवसापासूनच विजर्सन कुंडांची शहरात विविध ठिकाणी व्यवस्था केली आहे