‘ऐसी मेरी Vibe’चा फीव्हर

शिल्पा शेट्टीही थिरकल्या, कुणाल खेमूंच्या गाण्याची जोरदार चर्चा

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
मुंबई
shilpa shetty कुणाल खेमू प्रमुख भूमिकेत असलेल्या बहुप्रतिक्षित हाय-स्टेक्स अॅक्शन कॉमेडी ‘VIBE’ची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून थरारक अॅक्शन, विनोद, गोंधळ आणि अनपेक्षित ट्विस्टमधून भरलेल्या भन्नाट प्रवासाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली असून, त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यातच ‘VIBE’मधील जबरदस्त एनर्जेटिक आणि जोशपूर्ण “ऐसी मेरी Vibe” हे गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
 

shilpa shetty 
कुणाल खेमू आणि स्पर्श श्रीवास्तव यांच्या शानदार डान्स परफॉर्मन्सने सजलेल्या या गाण्याने प्रदर्शित होताच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. सध्या “ऐसी मेरी Vibe”च्या तालावर अनेकजण थिरकताना दिसत असून, या गाण्याचा फीव्हर सेलिब्रिटींमध्येही पोहोचला आहे. क्रिकेटपटू रोहित शर्मानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनाही या गाण्याच्या क्रेझपासून स्वतःला दूर ठेवता आलेले नाही.
शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या ‘VIBE’ चित्रपटातील “ऐसी मेरी Vibe” या गाण्यावर थिरकताना आणि गाण्याच्या तालावर मनसोक्त वाइब करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिलं. शिल्पा शेट्टी यांच्या या मजेशीर अंदाजामुळे “ऐसी मेरी Vibe” या गाण्याची वाढती क्रेझ पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे, या मजेशीर चॅलेंजच्या माध्यमातून त्या इतर सेलिब्रिटींनाही या गाण्यावर थिरकण्यासाठी नॉमिनेट करताना दिसत आहेत.
कुणाल खेमू यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या ‘VIBE’ या चित्रपटाची निर्मिती कुणाल खेमू आणि चिराग निहलानी यांनी Drongo Filmsच्या बॅनरखाली Amazon MGM Studiosच्या सहकार्याने केली आहे. या चित्रपटात कुणाल खेमू यांच्यासोबत प्रीती जी. झिंटा, स्पर्श श्रीवास्तव आणि पदार्पण करणारी वंशिका धीर प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. Amazon MGM Studiosचा हा चित्रपट येत्या 18 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.