एसटीच्या प्रवाश्यांसाठी मोठी आनंदवार्ता

एसटी महामंडळ टाटा मोटर्सकडून खरेदी करणार पाच हजार नव्या बसेस; ग्रामीण भागावर विशेष भर

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
मुंबई
st buses महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या ताफ्यात टाटा मोटर्सच्या तब्बल 5000 नव्या बसेस दाखल होणार आहेत. या बसेसच्या खरेदीसाठी राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, नामांकित टाटा मोटर्स कंपनीने सर्वात कमी दराचा देकार सादर केला आहे. नव्या बसेसच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम विश्वास राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

pratap
5000 जुन्या गाड्या होणार कालबाह्य
एसटी महामंडळासमोरील जुन्या गाड्यांची समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय अत्यंत कळीचा ठरणार आहे. पुढील 6 महिन्यांत सुमारे 5000 हून अधिक जुन्या बसेस प्रवासी सेवेतून कालबाह्य होणार आहेत. या पृष्ठभूमीवर नव्या बसेस ताफ्यात आल्यामुळे उर्वरित जुन्या गाड्यांवरील आणि मार्गांवरील अतिरिक्त ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. प्रवासादरम्यान अचानक बस बंद पडणे तसेच पावसाळ्यात बसेस गळण्याच्या वारंवार उद्भवणाऱ्य समस्यांवर प्रभावीपणे मात करता येईल. ग्रामीण आणि शहरी भागांतील लाखो प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवास सेवा उपलब्ध होईल.
 
‘मागेल त्याला बसफेरी’चे धोरण; ग्रामीण भागावर विशेष भर
नवीन 5000 बसेस उपलब्ध झाल्यानंतर एसटी महामंडळ प्रवाशांच्या मागणीनुसार ’मागेल त्याला बसफेरी’ हे धोरण राबवण्याच्या तयारीत आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात, जिथे एसटी ही एकमेव ’लोकवाहिनी’ आहे, तेथे फेèयांची संख्या वाढवली जाईल. मात्र, या नवीन बसफेèया तोट्यात चालू नयेत आणि महामंडळाला आर्थिक फटका बसू नये, यासाठी प्रवाशांनीही पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन परिवहनमंत्र्यांनी केले आहे.
एसटीच्या ताफ्याचे आधुनिकीकरण; विविध श्रेणींतील गाड्या सेवेत
गेल्या काही काळापासून एसटी महामंडळाने आपल्या बसताफ्याचा कायापालट करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीच प्रवाशांच्या सोयीसाठी 2-2 आसन व्यवस्थेच्या 2640 आधुनिक बसेस ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. याशिवाय 3 लू 2 आसन व्यवस्था असलेल्या 3000 ’राजमाता जिजाऊ’ बसेस ताफ्यात टप्प्याटप्प्याने दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आता टाटाच्या 5000 नव्या बसेसमुळे महामंडळाची वाहतूक क्षमता अधिक सक्षम होणार आहे.

ग्रामीण महाराष्ट्राच्या दळणवळणाला नवी दिशा
महाराष्ट्रातील दैनंदिन प्रवासाचा कणा मानल्या जाणाऱ्या एसटीच्या या मेगा ऑर्डरमुळे संपूर्ण राज्यभरातील वाहतूक व्यवस्थेला नवी ऊर्जा मिळणार आहे. ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदारांना या नव्या गाड्यांचा थेट फायदा होईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता या टाटा मोटर्सच्या नव्या बसेस प्रत्यक्षात रस्त्यावर कधीपासून धावणार आणि पहिल्या टप्प्यात त्या कोणत्या मार्गांवर तैनात केल्या जाणार, याकडे सर्व एसटी प्रवाशांचे लक्ष लागले आहे.