उंबर्डा बाजार,
State-level National Quality Assessmentयेथील आयुष्मान आरोग्य मंदिराचे राज्यस्तरीय राष्ट्रीय गुणवत्ता असेसमेंट मानकांचे (एनयूएएस) मूल्यमापन बुधवारी पार पडले. राज्यस्तरावरून आलेले डॉ. विनोद करंजीकर यांनी आयुष्मान आरोग्य मंदिरातील सहा विभागांची एनयूएएसच्या निकषांनुसार तपासणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांनी सहाही विभागांचे नियोजनबद्ध पद्धतीने सादरीकरण केले.

मूल्यमापनाच्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे यांनी उंबर्डा बाजार येथे भेट देऊन अधिकारी व कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. ’गुणवत्ता आणि सातत्य’ हा एनयूएएसचा पाया असल्याचे सांगत त्यांनी आरोग्य संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा सातत्याने उपलब्ध करून देण्यावर भर दिला, वाशीम जिल्ह्यातील १०० टक्के आरोग्य संस्थांना एनयूएएस प्रमाणित करण्याचा उद्देशही त्यांनी यावेळी स्पष्ट केला. कारंजा तालुयातील सर्व आरोग्य संस्थांना एनयूएएस प्रमाणित करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर नांदे मागील दोन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. सहाही विभागांच्या सादरीकरणात सहभागी होऊन त्यांनी राज्यस्तरीय अधिकार्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देत एनयूएएस मूल्यमापनासाठी जिल्हास्तरावरून डॉ. सायली फुलाडी तसेच लड्डा मॅडम, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाशिम यांनी सुद्धा उंबर्डा बाजार येथे भेट देऊन मार्गदर्शन केले.
आयुष्मान आरोग्य मंदिराला एनयूएएस प्रमाणपत्र मिळावे यासाठी कारंजा तालुयातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सपना जेसवानी व डॉ. अभिलाषा लकडे प्रयत्न करीत आवश्यक त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉ. अमृता कडसकर, सीमा जाधव, कविता पेठे, राजश्री धर्माळे, साक्षी भागवतकर, विनोद श्रीराव, रामहरी मुदे, निलेश पाटील, श्रीकिसन जाधव, विनोद गायकवाड, गणेश ठाकरे व गुणवंत बहाडे यांनीही मूल्यमापन प्रक्रियेत सहकार्य केले. तर उंबर्डा बाजार येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राधिका बियानी, डॉ. यश ढाकरे व डॉ. आकांक्षा पुणसे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रितम आडे, डॉ. सुषमा भगत, डॉ. संतोष बिबीनायके, आरोग्य सहाय्यक जितेंद्र महाजन व योगीराज ढवक, आरोग्य सहायिका हेमलता सातपुते, आरोग्य सेविका निलिमा राऊत, सागर राठोड, अंतकला लसणकुटे, मंगला भगत, बंदना सांगळे, संगीता सोनोने यासह इतर आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.