वरोडा
tremors coal mineवरोडा शहरातील एकोना कोळसा खाणीत दररोज होणार्या तीव्र स्फोटामुळे परिसरातील घरांना व व्यावसायिक इमारतींना तडे जात असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारला दुपारी 3.32 वाजताच्या सुमारास शहरात तीव्र क्षमतेचे धक्के जाणवल्याने नागरिक अधिकच भयभित झाले.
वरोडा शहरालगत असलेल्या एकोना व मार्डा येथील खुल्य कोळसा खाणीमध्ये सातत्याने कोळश्याच्या उत्खनासाठी तीव्र क्षमतेचे स्फोट केले जात आहेत. त्याबद्दल नागरिकांनी वारंवार तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत. शहरातील माढळी नाका परिसर, अभ्यंकर वार्ड, मोहबाळा मार्ग आदी ठिकाणी सातत्याने स्फोटाची तीव्रता जाणवते.
जनतेच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेचा हा अत्यंत गंभीर प्रश्न लक्षात घेता, संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि वेकोलिच्या अधिकार्यांची नुकतीर्च बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत खाणीतील ब्लास्टिंगच्या तीव्रतेवर तातडीने नियंत्रण आणणे, बाधित घरांची प्रशासनामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घेणे आणि कंपनांची तपासणी करणे या विषयांवर सविस्तर चर्चा करून अधिकार्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले. यावेळी खा. प्रतिभा धानोरकर आणि आ. करण देवतळे हे बैठकीला उपस्थित होते. यावेळी अधिकार्यांनी तडे गेलेल्या घरांची चौकशी करून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यावर काहीही उपाययोजना न केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.