‘तुझ्या आयला’चा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :14-Sep-2026
Total Views |
मुंबई
tujhya ayla trailer दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रयोगशील दिग्दर्शकीय शैलीची छाप असलेला ‘तुझ्या आयला’ हा आगामी मराठी चित्रपट आपल्या धाडसी विषयामुळे आणि वेगळ्या आशयामुळे सध्या चर्चेत आला आहे. ‘शाळा’ आणि ‘श्यामची आई’ यांसारख्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवलेल्या आशयघन चित्रपटांतून संवेदनशील विषय प्रभावीपणे मांडणाऱ्या सुजय डहाके यांनी यावेळी समाजात नकळत रूजलेल्या एका गंभीर प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यातून चित्रपटाच्या वेगळ्या आशयाची झलक पाहायला मिळत दडलेली आहे. ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’ ही चित्रपटाची हटके टॅगलाइनदेखील त्याच्या मध्यवर्ती विषयाकडे सूचकपणे लक्ष वेधते. आपल्या दैनंदिन व्यवहारात शाब्दिक हिंसा कशी सहजपणे रूजली आहे आणि तिचा व्यक्तीच्या मानसिकतेवर, विशेषतः आहे.
 

tujhya ayla trailer sujay dahake explores the impact of abusive language on society 
‘तुझ्या आयला’ हे शीर्षक ऐकताच अनेकांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहे. मात्र, या वेगळ्या शीर्षकामागे भाषा, संस्कार आणि शब्दांच्या परिणामांचा विचार करायला लावणारी संकल्पना दडलेली आहे. ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’ ही चित्रपटाची हटके टॅगलाइनदेखील त्याच्या मध्यवर्ती विषयाकडे सूचकपणे लक्ष वेधते. आपल्या दैनंदिन व्यवहारात शाब्दिक हिंसा कशी सहजपणे रूजली आहे आणि तिचा व्यक्तीच्या मानसिकतेवर, विशेषतः बालमनावर, कसा परिणाम होऊ शकतो, याचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
दिग्दर्शक सुजय डहाके यांनी या विषयाकडे केवळ मनोरंजनाच्या चौकटीतून न पाहता, त्यामागील सामाजिक आणि भावनिक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. आई ही प्रेम, माया आणि आदराचे प्रतीक मानली जाते; मात्र, तिच्याच नावाचा वापर अपमानास्पद भाषेत सहजपणे केला जातो, ही विसंगती चित्रपटाच्या विचारविश्वातील महत्त्वाची बाजू ठरते. आपण एखादा शब्द उच्चारताना त्याचा अर्थ, त्याचा परिणाम आणि तो समोरच्या व्यक्तीच्या मनावर उमटवू शकणारा आघात यांचा कितपत विचार करतो, हा अस्वस्थ करणारा प्रश्न ‘तुझ्या आयला’च्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
चित्रपटाच्या कथाविश्वात बालपण, खेळकरपणा, गावाकडचे वातावरण आणि निरागस आठवणी यांच्यासोबतच भाषेची कटू बाजूदेखील समोर येताना दिसते. त्यामुळे हा चित्रपट केवळ एका शब्दाभोवती फिरणारा विषय न राहता बालमन, संस्कार, सामाजिक व्यवहार आणि बदलती भाषिक संस्कृती यांचा वेध घेणारा अनुभव ठरण्याची शक्यता आहे. जुन्या आठवणींचा हळवा स्पर्श आणि आजच्या काळातील शाब्दिक हिंसेचे बोचरे वास्तव यांची सांगड चित्रपटाला वेगळी भावनिक धार देऊ शकते.
अनुभवी कलाकार आणि tujhya ayla trailer  बालकलाकारांची अनोखी सांगडही या कथेला भावनिक खोली देणारी ठरण्याची शक्यता आहे. एका बाजूला लक्षवेधी आणि धाडसी शीर्षक, तर दुसऱ्या बाजूला त्यामागे दडलेला गंभीर आशय, संवेदनशील विषयाला भिडण्याचे धाडस आणि सुजय डहाके यांची प्रयोगशील दिग्दर्शकीय दृष्टी यामुळे ‘तुझ्या आयला’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक वेगळा आणि लक्षवेधी प्रयोग ठरण्याची शक्यता आहे. केवळ मनोरंजन न करता आपल्या बोलण्याच्या सवयींकडे आणि शब्दांच्या परिणामांकडे नव्याने पाहण्यास भाग पाडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला लावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.