‘गणा धाव रे’ म्हणत अभिजीतचे बाप्पाला सुमधुर साद

मुलींच्या आवाजाचीही लाभली साथ

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
मुंबई
gana dhav re गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली असतानाच ट्रेंडसेटर गायक अभिजीत आपल्या चाहत्यांसाठी खास गणेशगीत घेऊन सज्ज झाला आहे. ‘गणा धाव रे’ या गाण्यातून त्याने लाडक्या गणरायाचे भक्तिभावाने स्वागत केले आहे. गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होणार, त्यांना मोदकांचा नैवेद्य दाखवला जाणार; अशा उत्सवी वातावरणात बाप्पाच्या आगमनासाठी खास गाण्याचीही मेजवानी रसिकांना मिळणार आहे.
 

abhijeet welcomes bappa with special song ‘gana dhav re’ featuring daughters ahana and sameera 
अभिजीत आपल्या सुमधुर आवाजातून कायमच प्रेक्षकांशी आपलेपणाचे नाते निर्माण करत आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी त्याने सादर केलेल्या ‘गणा धाव रे’ या गाण्यात त्याच्या गायनासोबत अभिनयाची झलकही पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आगमनाने वातावरण भक्तिमय आणि चैतन्याने भारून जाते. त्याच भावनेला साजेसं हे गाणं गोड आणि श्रवणीय स्वरूपात साकारण्यात आलं आहे.
या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे अभिजीतने पहिल्यांदाच आपल्या दोन मुलींसोबत हे गाणं केलं आहे. अहाना आणि समीरा सावंत यांनी ‘गणा धाव रे’साठी बॅकग्राऊंड व्होकल्स दिले आहेत. त्यामुळे अभिजीतच्या आवाजाला मुलींच्या गोड स्वरांची लाभलेली साथ या गाण्याला अधिकच भावस्पर्शी बनवत आहे. संगीत क्षेत्रातील आपल्या प्रवासात मुलींसोबत केलेलं हे पहिलं गाणं असल्याने अभिजीतसाठीही हा अनुभव विशेष ठरला आहे.
या गाण्याबद्दलची भावना व्यक्त gana dhav re करताना अभिजीत म्हणतो, “बाप्पाच्या गाण्याला माझ्या मुलींची साथ लाभणं हा बाप्पाचा योगायोग आहे. अहाना आणि समीरा यांच्यासोबत ‘गणा धाव रे’ रेकॉर्ड करतानाची भावना खूप भावनिक होती. माझ्या संगीत प्रवासातील आमच्या तिघांचं हे पहिलं गाणं खास बाप्पासाठी केलं, याहून मोठी गोष्ट काय असणार! बाप्पाचं सगळ्यांसोबत एक सुंदर नातं असतं, तेच या गाण्यातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.”
बाप्पाच्या आगमनाचा उत्साह, भक्तीची भावना आणि कुटुंबासोबतच्या नात्याचा हळुवार स्पर्श यांचा सुंदर मिलाफ ‘गणा धाव रे’ या गाण्यातून साधण्यात आला असून, गणेशोत्सवाच्या जल्लोषात हे गाणं रसिकांच्या पसंतीस उतरण्याची अपेक्षा आहे.