सलमान खानचा बॉडीगार्ड शेराचा मुलगा बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
मुंबई
Abir Singh बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा यांच्यातील जवळचे नाते सर्वश्रुत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेरा हा सलमानच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळताना त्याच्या सोबत सावलीप्रमाणे दिसतो. आता शेराचा मुलगा अबीर सिंह याच्यामुळे हे कुटुंब पुन्हा चर्चेत आले आहे. अबीर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत असून, त्याच्या पहिल्या चित्रपटाबाबतही चर्चा रंगली आहे.
 

Abir Singh salman khan’s bodyguard shera’s son abeer singh set for bollywood debut with ‘tarzan’? 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अबीर सिंहच्या डेब्यू चित्रपटाचे नाव ‘टार्जन’ असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात अभिनेता सोराज पंचोलीही महत्त्वाच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रोजेक्टबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चित्रपटाच्या नावासह कलाकारांच्या सहभागाबाबतची माहिती सध्या चर्चेपुरतीच मर्यादित आहे.
अबीरच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा मात्र अलीकडची नाही. 2022 पासूनच त्याच्या डेब्यूबाबत विविध बातम्या समोर येत आहेत. त्यावेळी सलमान खान स्वतः अबीरसाठी चित्रपट बनवण्यास उत्सुक असल्याचे वृत्त होते. या प्रोजेक्टच्या दिग्दर्शनासाठी दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्याशी सलमानने चर्चा केल्याचेही सांगितले जात होते.
या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी 2023 पासून सुरू होण्याची शक्यता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, संबंधित प्रोजेक्टची अधिकृत घोषणा कधीच करण्यात आली नाही. मार्च 2023 मध्ये सतीश कौशिक यांचे निधन झाल्यानंतर अबीरच्या या कथित डेब्यू प्रोजेक्टबाबतही फारशी माहिती समोर आली नाही. आता ‘टार्जन’ या नावाने अबीर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला असून, सोशल मीडियावरही त्याच्या कथित डेब्यूची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, ‘टार्जन’मध्ये सोराज पंचोलीच्या सहभागाची चर्चा होत असल्याने सलमान खानशी त्याचे असलेले जुने कनेक्शनही पुन्हा समोर आले आहे. सोराजने 2015 मध्ये सलमान खान निर्मित ‘हीरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातून अभिनेत्री अथिया शेट्टीनेही अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता.
दुसरीकडे, सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळेही चर्चेत आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये ‘मातृभूमि’ आणि ‘SVC63’ यांचा समावेश आहे. ‘मातृभूमि’चे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत असून, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच वामशी पैदिपल्ली दिग्दर्शित ‘SVC63’मध्ये सलमान खानसोबत नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रपटांव्यतिरिक्त सलमान खान सध्या छोट्या पडद्यावरही सक्रिय आहे. तो ‘बिग बॉस 20’चे सूत्रसंचालन करत असून, त्याच्या आगामी चित्रपटांसोबतच शेराचा मुलगा अबीर सिंह याच्या कथित बॉलिवूड पदार्पणाकडेही आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, ‘टार्जन’ आणि अबीरच्या सहभागाबाबतची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.